मस्त पाऊस . . पहिला वहिला पाऊस . . क्षणभर का होईना पण मनाला प्रचंड सुखावणारा पाऊस . . ओठावर एखादं छानसं गाणं उस्फुर्तपणे आणणारा पाऊस . . मातीला एक सुंदर दरवळणारा सुगंध देणारा पाऊस . . जुन्या आठवणीत हरवायला भाग पाडणारा पाऊस. . दोन जिवलगांना एकत्र आणून मन सुखावणारा पाऊस . . मस्त रोमांटिक मूड मध्ये घेऊन जाणारा पाऊस . . कवीच्या ओठावर अलगद कवीतेचे शब्द ठेवणारा पाऊस . . लहान मुलांना आईकडे पावसात भिजण्याचा हट्ट करायला लावणारा खट्याळ पाऊस . . mind फ्रेश करणारा पाऊस . . पहिला वहिला पाऊस . .
कॉलेज मधून बाहेर पडले, अचानक पावसाचे थेंब पडायला लागले . आणि हि पावसाची रूपं अगदी अलगद डोळ्यासमोर येऊ लागली . मनात एक अनामिक चैतन्य निर्माण झाले . या थंड गारव्याने मला स्वतःवर प्रेम करायला जणू भाग पाडले . आणि क्षणभरातच आत्तापर्यंतच्या आयुष्याचं रंगबेरंगी इंद्रधनुष्य डोळ्यासमोर तराळू लागले . मग उगाचच ,
ओरे मनवा तू तो बावरा है . .
तुही जाने तू क्या सोचता है . .
हे गाणं मी गुणगुणू लागले. अगदी थोड्याच वेळात मी माझे आयुष्य परत जगल्याचा भास झाला मला . माझं बालपण , माझं बालमन या पावसाने कसं हर्षून टाकलं होतं . या रणरणत्या भास्कर प्रमाणे पाऊस पण या आठवणींचा साक्षीदार . अश्या अनेक आठवणी या पावसा मुळेच तर आठवणी झाल्या . .
पाऊस तसा पाहुणाच पण जेव्हा येतो तेंव्हा आपलं मन अगदी हर्षून टाकतो, दुःखा मागून येणाऱ्या सुखासारखा. किती साम्य आहे ना या पाऊसात आणि सुखात, कधी तरी येणारी हि दोन्ही पर्वे पण मनाला मात्र त्या काही थोड्या क्षणात अख्ख आयुष्य जगण्याची उभारी देऊन जातात. मलाही आत्ता या अश्यावेळी अगदी नदीच्या पुलावर जाऊन उभं राहावं आणि अखंड भिजावं, सगळी उमेद एकदम भरून घ्यावी. मनावरची सगळी मळभ झटकून द्यावी असं वाटू लागलय. तस तर या थोड्याश्या पावसाने मन बरचं प्रसन्न केलेय पण तरीही हा क्षण अजून अजून भरून मनात साठवून ठेवावा आणि लागेल तसा आणि तेंव्हा वापरावा असं वाटतंय . असोत . .
हा पाऊस असाच परत परत येत राहूदेत आणि हा आनंद मला असाच साठवून राहूदेत.
येरे येरे पावसा तुला देतो पैसा. .
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा . . .
Sundar...
ReplyDeleteUttam prakaare saglya bhavnancha varnan kelayes...
Mastach.. :)
tysm amit..:)
ReplyDeletekhupach chan...mast jamlego...
ReplyDeletetysm..:)
Delete