Wednesday 25 March 2015

तो......

तो....
एक सामान्य व्यक्तीमत्व...
पण तरी मनाला भावणारं...
अचानक अालेलं वादळ...
हवेहवेसे वाटणारं...
एक लोभसवाणा वारा...
एक शांत रम्य संध्याकाळ...
एक प्रसन्न सकाळ...
एक सतत गुणगुणत रहावे असं गाणं...
रणरणत्या ऊन्हात पावसाची थंडगार सर...
एक सुरक्षा कवच... 
निरागस माया..,
व्यक्त न करता येणार प्रेम...
एक अनामीक भास...
विस्मरणिय क्षण..
हरवून जाण्याची भीती..
स्वतःच च जणू प्रतिबिंब..
पाहत रहावे असं सुंदर फुल..
असा हवाहवासा वाटणारा तो...
पण अस्तित्वात नसलेला तो..
तो... 

Thursday 25 September 2014

पाऊस.पहिला वहिला..!



          मस्त पाऊस . . पहिला वहिला पाऊस . . क्षणभर का होईना पण मनाला प्रचंड सुखावणारा पाऊस . . ओठावर एखादं छानसं गाणं उस्फुर्तपणे आणणारा पाऊस . . मातीला एक सुंदर दरवळणारा सुगंध देणारा पाऊस . . जुन्या आठवणीत हरवायला भाग पाडणारा पाऊस. . दोन जिवलगांना एकत्र आणून मन सुखावणारा पाऊस . . मस्त  रोमांटिक मूड मध्ये घेऊन जाणारा पाऊस . . कवीच्या ओठावर अलगद कवीतेचे शब्द ठेवणारा पाऊस . . लहान मुलांना आईकडे पावसात भिजण्याचा हट्ट करायला लावणारा खट्याळ पाऊस . . mind फ्रेश करणारा पाऊस . . पहिला वहिला पाऊस . .
          कॉलेज मधून बाहेर पडले, अचानक पावसाचे थेंब पडायला लागले . आणि हि पावसाची रूपं अगदी अलगद डोळ्यासमोर येऊ लागली . मनात एक अनामिक चैतन्य निर्माण झाले . या थंड गारव्याने मला स्वतःवर प्रेम करायला जणू भाग पाडले . आणि क्षणभरातच आत्तापर्यंतच्या आयुष्याचं रंगबेरंगी इंद्रधनुष्य डोळ्यासमोर तराळू लागले . मग उगाचच ,
          ओरे मनवा तू  तो बावरा है . .
          तुही जाने तू क्या सोचता है . .
हे गाणं मी गुणगुणू लागले. अगदी थोड्याच वेळात मी माझे आयुष्य परत जगल्याचा भास  झाला मला . माझं बालपण , माझं बालमन या पावसाने कसं हर्षून टाकलं होतं . या रणरणत्या भास्कर प्रमाणे पाऊस पण या आठवणींचा साक्षीदार . अश्या अनेक आठवणी या पावसा मुळेच तर आठवणी झाल्या . .
           पाऊस तसा पाहुणाच पण जेव्हा येतो तेंव्हा आपलं मन अगदी हर्षून टाकतो, दुःखा मागून येणाऱ्या सुखासारखा. किती साम्य आहे ना या पाऊसात आणि सुखात, कधी तरी येणारी हि दोन्ही पर्वे पण मनाला मात्र त्या काही थोड्या क्षणात अख्ख आयुष्य जगण्याची उभारी देऊन जातात. मलाही आत्ता या अश्यावेळी अगदी नदीच्या पुलावर जाऊन उभं राहावं आणि अखंड भिजावं, सगळी उमेद एकदम भरून घ्यावी. मनावरची सगळी मळभ झटकून द्यावी असं वाटू लागलय. तस तर या थोड्याश्या पावसाने मन बरचं प्रसन्न केलेय पण तरीही हा क्षण अजून अजून भरून मनात साठवून ठेवावा आणि लागेल तसा आणि तेंव्हा वापरावा असं वाटतंय . असोत . . 
          हा पाऊस असाच परत परत येत राहूदेत आणि हा आनंद मला असाच साठवून  राहूदेत. 
          येरे येरे पावसा तुला देतो पैसा. . 
          पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा . . .

Sunday 6 May 2012

उमेद

                      शी ....ही घाणेरडी पाऊसाची चीक चीक ... सुटटी संपल्यामुळे असलेली गर्दी , हातात ह्या दोन जड पिशव्या.. हे सगळे हातात घेउन एकदाचा गड सर केला, हो गडच. अश्या परिस्थितीत ' महाराष्ट्र राज्य परिवहन ' मंडळाच्या गाडीत चढणे म्हणजे गड  सर करण्यासारखेच नव्हे का? आणि हो गाडीत जागा मिळाली हे विशेष... एकदाची सेटल जाले. बापरे..! कधी प्रवासच करू नये असे वाटले.गाडी एकदाची  स्थानकातून  बाहेर पडली  आणि माझी विचारांची गाडी  नेहमी प्रमाणे जोरात  धावू लागली. काय सालं हे नशीब... आज स्वताची गाडी असती तर ?? अश्यातच माझे कडे हे आहे, ते नाही म्हणत नशिबाला दोष देणे चालू जाले आणि बाकीच्या वेळी हवाहवासा वाटणारा वारा पण टोचू लागला.
                    अचानक माझी नजर माझ्या शेजारच्या सीट वर बसलेल्या दोघांकडे गेली.माझ्याच वयाचे म्हणजे 20-25 चे होते ते दोघे, एक मुलगा आणि एक मुलगी. पण  त्यांच्या  कडे  लक्ष  जाताच  माझी  विचारांची  गाडी  अचानक ब्रेक लावून थांबली. डोळे चटकन पाणावले. आणि माझ्या विचारांच्या गाडीने चटकन गिअर चेंज केला. 
                    आपली लाईफ ही किती अपेक्षांनी भरलेली असते ना.. या आयुष्यात अपेक्षा ठेवण्या  शिवाय आपण काही करतो का असा प्रश्न मला पडला. मला हे पाहिजे ते पाहिजे यातच तर सामावलेले असते 
आपले आयुष्य. आपल्या कडे नसलेली एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण काय काय करतो ना. अगदी आकाश पातळ एक करतो . आणि तरी देखील नाही मिळाली तर खचून जातो. डिप्रेस होतो, जगण्याची 
उमेद च संपून जाते. अगदी जीव देण्यापर्यंत विचार करतो. काहीजण तर जीव देतात सुद्धा.. यातले काही नाही. यातले काही केले नाही तर दैवाला दोष मात्र नक्की देतो. पण ज्यांच्या कडून दैवाने त्यांची खरी संपती  हिरावून घेतली आहे ते काय करत असतील हा विचार केला आहे आपण कधी? विचार करत असाल न मी  अस  का बोलतेय..? कारण मी ज्या दोघां विषयी बोलत होते ना ते दोघे  ' मुकबधीर ' होते.. हो...
                  ते दोघे बरेच काही शिकवून गेले मला काही क्षणात.. बरेच काही बोलत होते ते एकमेकांशी. हो बोलतच होते.. बोलता येत नसले तरी ते बोलत होते, ऐकता येत नसताना देखील एकमेकांना ऐकत होते.  फक्त एकच भाषा अवगत होती त्यांना.. डोळ्यांची .... त्यातच ते किती आनंदी होते , समाधानी होते. आपल्या भावना किती छान व्यक्त करत होते. शब्द किती महत्वाचे असतात ना आयुष्यात..  नाती  जोडण्यासाठी आणि तोडण्यासाठी सुद्धा.. याच महत्वाच्या गोष्टी पासून ते वंचित होते तरीही किती आनंदी होते. दुःखाचा एक लवलेशही नव्हता चेहऱ्यावर ..सतत हसरे भाव..
                आपण मात्र किती छोट्या छोट्या गोष्टी साठी  दुःखी होत असतो. किती  फरक आहे न आपल्यात  आणि त्यांच्यात...दैवाने त्यांच्या कडून सगळे हिरावून घेवून देखील जर ते त्यांचे आयुष्य इतक्या उमेदीने  जगू शकतात तर आपण का नाही..??
                अस म्हणतात कि आपल भविष्य आपल्या हातावरच्या रेषा ठरवतात, पण म्हणून  काही हात  नसलेल्यांचे भविष्यच नसते का..???
               आपणही या गोष्टींचा विचार करून त्यांना डोळ्यासमोर ठेऊन छोट्या छोट्या गोष्टीनी खचून न जाता, नव्या जोमाने व नव्या उमेदीने हे आयुष्य जगले पाहिजे. हे लक्षात ठेवले पाहिजे कि आयुष्य खूप सुंदर आहे  आणी आपणच त्याला आणखी सुंदर बनवू शकतो.
              बरेच काही शिकवून गेले न ते दोघे.. आणि तेही न बोलता... म्हणूनच नव्या जोमाने  व नव्या  उमेदीने लिहिलेला हा माझ्या पहिला वाहिला लेख त्या दोघांना अर्पण... उमेद....