Sunday, 6 May 2012

उमेद

                      शी ....ही घाणेरडी पाऊसाची चीक चीक ... सुटटी संपल्यामुळे असलेली गर्दी , हातात ह्या दोन जड पिशव्या.. हे सगळे हातात घेउन एकदाचा गड सर केला, हो गडच. अश्या परिस्थितीत ' महाराष्ट्र राज्य परिवहन ' मंडळाच्या गाडीत चढणे म्हणजे गड  सर करण्यासारखेच नव्हे का? आणि हो गाडीत जागा मिळाली हे विशेष... एकदाची सेटल जाले. बापरे..! कधी प्रवासच करू नये असे वाटले.गाडी एकदाची  स्थानकातून  बाहेर पडली  आणि माझी विचारांची गाडी  नेहमी प्रमाणे जोरात  धावू लागली. काय सालं हे नशीब... आज स्वताची गाडी असती तर ?? अश्यातच माझे कडे हे आहे, ते नाही म्हणत नशिबाला दोष देणे चालू जाले आणि बाकीच्या वेळी हवाहवासा वाटणारा वारा पण टोचू लागला.
                    अचानक माझी नजर माझ्या शेजारच्या सीट वर बसलेल्या दोघांकडे गेली.माझ्याच वयाचे म्हणजे 20-25 चे होते ते दोघे, एक मुलगा आणि एक मुलगी. पण  त्यांच्या  कडे  लक्ष  जाताच  माझी  विचारांची  गाडी  अचानक ब्रेक लावून थांबली. डोळे चटकन पाणावले. आणि माझ्या विचारांच्या गाडीने चटकन गिअर चेंज केला. 
                    आपली लाईफ ही किती अपेक्षांनी भरलेली असते ना.. या आयुष्यात अपेक्षा ठेवण्या  शिवाय आपण काही करतो का असा प्रश्न मला पडला. मला हे पाहिजे ते पाहिजे यातच तर सामावलेले असते 
आपले आयुष्य. आपल्या कडे नसलेली एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण काय काय करतो ना. अगदी आकाश पातळ एक करतो . आणि तरी देखील नाही मिळाली तर खचून जातो. डिप्रेस होतो, जगण्याची 
उमेद च संपून जाते. अगदी जीव देण्यापर्यंत विचार करतो. काहीजण तर जीव देतात सुद्धा.. यातले काही नाही. यातले काही केले नाही तर दैवाला दोष मात्र नक्की देतो. पण ज्यांच्या कडून दैवाने त्यांची खरी संपती  हिरावून घेतली आहे ते काय करत असतील हा विचार केला आहे आपण कधी? विचार करत असाल न मी  अस  का बोलतेय..? कारण मी ज्या दोघां विषयी बोलत होते ना ते दोघे  ' मुकबधीर ' होते.. हो...
                  ते दोघे बरेच काही शिकवून गेले मला काही क्षणात.. बरेच काही बोलत होते ते एकमेकांशी. हो बोलतच होते.. बोलता येत नसले तरी ते बोलत होते, ऐकता येत नसताना देखील एकमेकांना ऐकत होते.  फक्त एकच भाषा अवगत होती त्यांना.. डोळ्यांची .... त्यातच ते किती आनंदी होते , समाधानी होते. आपल्या भावना किती छान व्यक्त करत होते. शब्द किती महत्वाचे असतात ना आयुष्यात..  नाती  जोडण्यासाठी आणि तोडण्यासाठी सुद्धा.. याच महत्वाच्या गोष्टी पासून ते वंचित होते तरीही किती आनंदी होते. दुःखाचा एक लवलेशही नव्हता चेहऱ्यावर ..सतत हसरे भाव..
                आपण मात्र किती छोट्या छोट्या गोष्टी साठी  दुःखी होत असतो. किती  फरक आहे न आपल्यात  आणि त्यांच्यात...दैवाने त्यांच्या कडून सगळे हिरावून घेवून देखील जर ते त्यांचे आयुष्य इतक्या उमेदीने  जगू शकतात तर आपण का नाही..??
                अस म्हणतात कि आपल भविष्य आपल्या हातावरच्या रेषा ठरवतात, पण म्हणून  काही हात  नसलेल्यांचे भविष्यच नसते का..???
               आपणही या गोष्टींचा विचार करून त्यांना डोळ्यासमोर ठेऊन छोट्या छोट्या गोष्टीनी खचून न जाता, नव्या जोमाने व नव्या उमेदीने हे आयुष्य जगले पाहिजे. हे लक्षात ठेवले पाहिजे कि आयुष्य खूप सुंदर आहे  आणी आपणच त्याला आणखी सुंदर बनवू शकतो.
              बरेच काही शिकवून गेले न ते दोघे.. आणि तेही न बोलता... म्हणूनच नव्या जोमाने  व नव्या  उमेदीने लिहिलेला हा माझ्या पहिला वाहिला लेख त्या दोघांना अर्पण... उमेद....
                 



5 comments: